Annual Player Retainership 2022-23: बीसीसीआयने केली वार्षिक कराराची घोषणा; 26 खेळाडूंना मिळाले स्थान

अव्वल श्रेणी ए प्लस अंतर्गत वार्षिक सात कोटी, अ अंतर्गत पाच कोटी, ब अंतर्गत तीन आणि सी श्रेणी अंतर्गत खेळाडूंना वर्षभरात रिटेनरशिप फी दिली जाते.

बीसीसीआय (Photo Credits: IANS)

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022-23 या वर्षासाठी वार्षिक करार जाहीर केला आहे. यावेळी मंडळाने मोठ्या दिरंगाईने वार्षिक करार जाहीर केला आहे. मंडळ वार्षिक करारांतर्गत A-Plus, A, B आणि C या चार श्रेणींमध्ये वार्षिक करार देते. रवींद्र जडेजाने प्रथमच अव्वल श्रेणीत प्रवेश केला आहे. अव्वल श्रेणी ए प्लस अंतर्गत वार्षिक सात कोटी, अ अंतर्गत पाच कोटी, ब अंतर्गत तीन आणि सी श्रेणी अंतर्गत खेळाडूंना वर्षभरात रिटेनरशिप फी दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून रोहित, विराट आणि जसप्रीत बुमराह हे A+ श्रेणीत होते, मात्र आता रवींद्र जडेजाच्या नावाचाही त्यात समावेश झाला आहे. या कराराद्वारे एकूण 26 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement