Afghanistan New Batting Coach: आशिया चषकापूर्वी अफगाणिस्तानने 'या' भारतीयाची प्रशिक्षकपदी केली नियुक्ती, आपल्याच संघाविरुद्ध बनवणार रणनीती
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका माजी भारतीय खेळाडूची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या खेळाडूला प्रदीर्घ प्रशिक्षणाचा अनुभव आहे.
आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2023) अफगाणिस्तान क्रिकेट संघाला (ACB) पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका माजी भारतीय खेळाडूची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या खेळाडूला प्रदीर्घ प्रशिक्षणाचा अनुभव आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मिलाप प्रदीपकुमार मेवाडा (Milap Pradeepkumar Mewada) यांची राष्ट्रीय संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच ते संघात सामील झाले आहे. जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यावर ते अफगाणिस्तान संघासोबत होते. त्याचे काम पाहून त्याला पूर्णवेळ कंत्राट देऊ करण्यात आले आहे.
🚨 NEWS 🚨
ACB has appointed Mr. Milap Pradeepkumar Mewada as the National Team’s New Batting Coach. He has already joined the AfghanAtalan squad in Sri Lanka ahead of the Super Cola Cup Afghanistan vs Pakistan three-match ODI Series.
Read More: https://t.co/rHi0AvcLoo pic.twitter.com/4qJEE48min
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

