IND vs IRE T20 Series 2023 Schedule: वेस्ट इंडिज नंतर भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची खेळणार टी-20 मालिका, येथे पहा संपूर्ण वेळापत्रक

आयसीसीने ट्विट करत वेळापत्रकाची पुष्टी केली आहे. आयसीसीने लिहिले- मालाहाइड पार्टीसाठी कोण तयार आहे. आयर्लंड ऑगस्टमध्ये तीन सामन्यांच्या टा-20 मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवणार आहे.

IND vs IRE

IND vs IRE T20 Series 2023: क्रिकेट आयर्लंडने भारताविरुद्धच्या (IND vs IRE) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले (T20 Series 2023 Schedule) आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ आयर्लंडला पोहोचणार आहे. ही मालिका 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तिन्ही टी-20 सामने मालाहाइडमध्ये खेळवले जातील. आयसीसीने ट्विट करत वेळापत्रकाची पुष्टी केली आहे. आयसीसीने लिहिले- मालाहाइड पार्टीसाठी कोण तयार आहे. आयर्लंड ऑगस्टमध्ये तीन सामन्यांच्या टा-20 मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली असली तरी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झालेला नाही. वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय एकत्रितपणे संघ जाहीर करेल, असे मानले जात आहे.

आयर्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना - 18 ऑगस्ट, मालाहाइड

दुसरा सामना - 20 ऑगस्ट, मालाहाइड

तिसरा सामना - 23 ऑगस्ट, मालाहाइड

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement