IND vs AUS 2nd T20: विजयानंतर कर्णधार रोहितने कार्तिकला मारली मिठी, अभिमानाने फडकला तिरंगा (Watch Video)
पण शेवटच्या वेळी दिनेश कार्तिकने षटकरा आणि चौकार मारुन सामना जिंकवला.
टीम इंडियाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना 6 विकेटने जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे लक्ष्य 7.2 षटकांत पार केले. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो रोहित शर्मा होता ज्याने नाबाद 46 धावांची शानदार खेळी खेळली. पण शेवटच्या वेळी दिनेश कार्तिकने षटकरा आणि चौकार मारुन सामना जिंकवला. या विजयानंतर रोहित शर्मा चांगलाच आंनदात दिसुन आला. त्यांने कार्तिकला मिठी मारली. आता ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून रविवारी हैदराबादमध्ये निर्णायक सामना खेळवला जाणार आहे.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)