IPL 2023: चेन्नईत कायम राहिल्यानंतर जडेजाने धोनीसोबतचा फोटो केला शेअर, म्हणाला...
चेन्नईमध्ये कायम ठेवल्यानंतर जडेजाने सोशल मीडियावर धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) साठी, सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान अनेक संघांनी धक्कादायक निर्णय घेतले आहेत. चेन्नईचा संघही त्यापैकीच एक आहे. चेन्नईने ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) सोडले असून रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कायम ठेवले आहे. चेन्नईमध्ये कायम ठेवल्यानंतर जडेजाने सोशल मीडियावर धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो धोनीला वाकून नमस्कार करत आहे. यासोबत जडेजाने लिहिले की, सर्व काही ठीक आहे. त्याचवेळी जडेजाला रिटेन केल्यानंतर चेन्नई संघाने त्याचा फोटो शेअर करत आठवे आश्चर्य आमच्यासोबत राहील असे लिहिले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)