IND vs BAN 2nd Test Live Update: ऋषभ पंतपाठोपाठ श्रेयस अय्यरनेही झळकावले अर्धशतक, टीम इंडियाची धावसंख्या 215च्या पार

दरम्यान, ऋषभ पंतनंतर आता श्रेयस अय्यरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

IND vs BAN 2nd Test Live Update: ऋषभ पंतपाठोपाठ श्रेयस अय्यरनेही झळकावले अर्धशतक, टीम इंडियाची धावसंख्या 215च्या पार
श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवशीही खेळ सुरूच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 19 धावा केल्या होत्या. सलामीवीर केएल राहुल टीम इंडियाची कमान सांभाळत आहे. तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियात एक बदल झाला आहे. कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली आहे. बांगलादेशचा पहिला डाव 73.5 षटकांत 227 धावांत आटोपला. बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. दरम्यान, ऋषभ पंतनंतर आता श्रेयस अय्यरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. टीम इंडियाचा स्कोर 216/4 आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2022 01:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).