IND vs PAK, Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध खराब शॉट खेळून ऋषभ पंत बाद, रोहित शर्मा संतापला (Watch Video)

सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रोहित ड्रेसिंग रूममध्ये पंत आणि हार्दिकला फटकारताना दिसत आहे.

IND vs PAK, Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध खराब शॉट खेळून ऋषभ पंत बाद, रोहित शर्मा संतापला (Watch Video)
Photo Credit - Twitter

आशिया चषक सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकांत 7 विकेट गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना 5 गडी गमावत 182 धावा करून सामना जिंकला. दरम्यान, भारतीय फलदांजी वेळेनुसार ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला. पंतने 12 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. शादाब खानने त्याला आसिफ अलीकडे झेलबाद केले. खराब शॉट्स खेळून रोहित आणि हार्दिक बाद झाल्यावर कर्णधार रोहित ड्रेसिंग रूममध्ये चांगलाच संतापलेला दिसला. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रोहित ड्रेसिंग रूममध्ये पंत आणि हार्दिकला फटकारताना दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2022 11:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).