IND vs BNG ODI & Test Series 2022 Schedule: न्यूझीलंडसोबत वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा बांग्लादेश दौरा, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक
या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेने होईल जिथे पहिला एकदिवसीय सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
India Tour of Bangladesh 2022: भारतीय संघ न्यूझीलंडसोबत वनडे मालिका गमावल्यानंतर लगचेच बांगलादेशचा दौरा करणार आहे. जिथे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळेल. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेने होईल जिथे पहिला एकदिवसीय सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. चला तर मग आम्ही तुम्हाला या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक...
जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक
1. एकदिवसीय मालिका
- पहिला एकदिवसीय: 4 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाक
- दुसरी एकदिवसीय: 7 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
- तिसरा एकदिवसीय: 10 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव
2. कसोटी मालिका
- पहिली कसोटी मालिका: 14 – 18 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव
- दुसरी कसोटी मालिका: 22 – 26 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)