India Lost WC Finals: 'आम्ही आज आणि सदैव तुमच्यासोबत आहोत', टीम इंडियाच्या पराभवावर पंतप्रधान मोदींचे ट्विट, ऑस्ट्रेलियाच्या विजयाबद्दल अभिनंदन
आयसीसी नॉकआऊटमधील टीम इंडियाचा गेल्या 10 वर्षांतील हा आठवा पराभव आहे. या वर्षी भारतीय संघ सलग दुसरा आयसीसी बाद फेरीत हरला आहे. ऑस्ट्रेलियाचे हे 10वे आयसीसी विजेतेपद ठरले. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसला
विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. आयसीसी नॉकआऊटमधील टीम इंडियाचा गेल्या 10 वर्षांतील हा आठवा पराभव आहे. या वर्षी भारतीय संघ सलग दुसरा आयसीसी बाद फेरीत हरला आहे. ऑस्ट्रेलियाचे हे 10वे आयसीसी विजेतेपद ठरले. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता आणि मैदान सोडताना त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. या पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला पांठिबा दिला. ट्वीट करत म्हणाले, 'प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि जिद्द लक्षात घेण्याजोगी होती. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)