Mohammad Nabi Resigns As Afghanistan Captain: टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकू न शकल्याने मोहम्मद नबीने अफगाणिस्तानचे कर्णधारपद सोडले

अफगाणिस्तानच्या संघाला टी-20 विश्वचषकात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

मोहम्मद नबी (Photo: Twitter)

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) संघाचे कर्णधारपद सोडले आहे. नबीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकातील सुपर 12 मध्ये एकही सामना जिंकू शकला नाही. अफगाणिस्तानच्या संघाला टी-20 विश्वचषकात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी न्यूझीलंड आणि आयर्लंडविरुद्धचा त्यांचा सामना पावसात वाहून गेला. मोहम्मद नबीने ट्वीटवर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)