PAK vs AFG: अफगाणिस्तानच्या नवव्या क्रमांकाच्या फलंदाजाने पाकिस्तानच्या 'पेस अटॅक'चा केला पर्दाफाश, षटकार ठोकून नावावर केला रेकाॅर्ड (Watch Video)

आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुजीबने या सामन्यातही बॅटने धुमाकूळ घातला आणि दोन विक्रम केले, त्यापैकी एक तो कायम लक्षात ठेवायचा. 269 धावांचे लक्ष्य गाठताना मुजीब 33व्या षटकात फलंदाजीला आला आणि त्याने तीन चौकार आणि पाच षटकार मारून अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

PAK vs AFG: अफगाणिस्तानच्या नवव्या क्रमांकाच्या फलंदाजाने पाकिस्तानच्या 'पेस अटॅक'चा केला पर्दाफाश, षटकार ठोकून नावावर केला रेकाॅर्ड (Watch Video)

Mujeeb Ur Rehman Record: अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पाकिस्तानने (Pakistan Beat Afghanistan) जिंकला असेल, पण अफगाणिस्तानसाठी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुजीब-उल-रहमानची (Mujeeb-ul-Rehman) खेळी ते कधीच विसरणार नाहीत. आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुजीबने या सामन्यातही बॅटने धुमाकूळ घातला आणि दोन विक्रम केले, त्यापैकी एक तो कायम लक्षात ठेवायचा. 269 धावांचे लक्ष्य गाठताना मुजीब 33व्या षटकात फलंदाजीला आला आणि त्याने तीन चौकार आणि पाच षटकार मारून अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला. त्याने राशिद खानचाही विक्रम मोडला. राशिदने जानेवारी 2021 मध्ये अबू धाबी येथे आयर्लंडविरुद्ध 27 चेंडूत अर्धशतक केले होते.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2023 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).