Afghanistan Squad for Asian Games 2023 Announced: अफगाणिस्तानने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ केला जाहीर, 'या' खेळाडूंना संघात मिळाले स्थान
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष संघाची घोषणा केली आहे. गुलबदिन नायबला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर युवा आणि अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.
आशियाई क्रीडा 2023 (Asian Games 2023) मधील क्रिकेट सामने 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जातील. आशियाई खेळ 2023 चे आयोजन चीनमधील हांगझोऊ येथे होत आहे. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष संघाची घोषणा केली आहे. गुलबदिन नायबला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर युवा आणि अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे. एसीसी पुरुषांच्या उदयोन्मुख आशिया कप 2023 मध्ये सहभागी झालेल्या बहुतेक खेळाडूंना अफगाणिस्तान संघात संधी मिळाली आहे. यामध्ये नूर अली जद्रान, झुबैद अकबरी, शराफुद्दीन अश्रफ, सय्यद अहमद शिरजाद आणि शाहीदुल्ला कमाल या खेळाडूंचाही समावेश आहे.
आशियाई स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघ:
गुलबदीन नायब (कर्णधार), मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), सेदीकुल्ला अटल, झुबैद अकबरी, नूर अली जद्रान, शाहीदुल्ला कमाल, अफसर झझाई, वफीउल्लाह तरखिल, करीम जन्नत, शराफुद्दीन अश्रफ, फरीद अहमद मलिक, निजात मसूद, सय्यद अहमद शिरजाद, कैस अहमद. आणि झहीर खान.
🚨 Squad Alert 🚨
Meet AfghanAbdalyan Squad for the Asian Games Men's Cricket Competitions. @GbNaib appointed as skipper whereas @MShahzad077 as his deputy 🤩
More 👉: https://t.co/psmBzW76JV pic.twitter.com/2p1OMKsiTs
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2023 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

