ZIM vs AFG 1st T20I 2024 Live Toss Update: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने जिंकली नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्तानने 15 पैकी 14 टी-20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने फक्त 1 सामना जिंकला आहे. यावरून अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते.

AFG vs ZIM (Photo Credit - X)

Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 1st T20 Match 2024 Live Toss Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे. टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्तानने 15 पैकी 14 टी-20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने फक्त 1 सामना जिंकला आहे. यावरून अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, हजरतुल्ला झाझई, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, मोहम्मद इशाक, रशीद खान (क), मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फरीद अहमद मलिक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement