Shikhar Dhawan and Ayesha Mukherjee Divorce Case: 'मुलावर एकट्या आईचा अधिकार नाही...', कोर्टाने शिखर धवनच्या पत्नीला मुलाला भारतात आणण्याचे दिले आदेश

खरं तर, कोर्टाने हा निकाल देत एकट्या आईचा मुलावर अधिकार नसतो आणि आयेशा मुखर्जीला आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत.

Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनचा (Shikhar Dhawan) मुलगा जोरावरही पत्नी आयेशा मुखर्जीपासून (Ayesha Mukherjee) विभक्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात त्याच्या आईसोबत राहत आहे. दरम्यान, दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने क्रिकेटर शिखर धवनची पत्नी आयशा हिला त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर, कोर्टाने हा निकाल देत एकट्या आईचा मुलावर अधिकार नसतो आणि आयेशा मुखर्जीला आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्याचे आदेश दिले आहेत. शिखर आणि त्याचे कुटुंब ऑगस्ट 2020 पासून मुलाला भेटलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची भेट न झाल्याबद्दल न्यायालयाने तिला फटकारले आहे. घटस्फोट आणि मुलांच्या कस्टडीबाबत सुरू असलेले प्रकरण शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांच्यात घटस्फोट आणि मुलाच्या ताब्याबाबत खटला सुरू आहे. याआधी धवनने न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये आयशा आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता न्यायालयाने त्यांच्या मुलाला भारतात पाठवण्याचे मोठे आदेश दिले आहेत. या दोघांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये कायदेशीर खटले दाखल आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)