CSK Beat RCB: पहिल्या सामन्यात चेन्नईचा दणदणीत विजय, आरसीबीचा सहा गडी राखून केला पराभव
आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा सहा गडी राखुन पराभव केला.
CSK vs RCB, IPL 1st Match: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2024) आजपासून सुरूवात झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा सहा गडी राखुन पराभव (CSK Beat RCB) केला. तत्तपूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून स्टार फलंदांज अनुज रावतने सर्वाधिक 48 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सीएसकेने 18.4 षटकात चार गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर रचिन रवींद्रने 37 धावांची शानदार खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Match 1. Chennai Super Kings Won by 6 Wicket(s) https://t.co/4j6FaLF15Y #TATAIPL #IPL2024 #CSKvRCB
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2024 11:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

