43 Runs In One Over: इंग्लंडचा गोलंदाज Ollie Robinson चा लाजिरवाणा विक्रम; क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडे ओव्हर, दिल्या 43 रन्स (Watch Video)

काऊंटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात, रॉबिन्सनने एका षटकात 43 धावा दिल्या.

43 Runs In One Over

Louis Kimber Smashes Record Over Against Ollie Robinson: क्रिकेटमध्ये असे काही रेकॉर्ड आहेत जे सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. आता असाच एक विक्रम इंग्लंडमध्ये झाला आहे. टी-20 क्रिकेटच्या शर्यतीत आता कसोटी किंवा प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही खेळाडूंनी तुफानी फलंदाजी सुरू केली आहे. काऊंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्यात लीसेस्टरशायरच्या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीने सर्वांना चकित केले. लुईस किम्बरने इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनच्या षटकात तब्बल 43 धावा ठोकल्या.

काऊंटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात, रॉबिन्सनने एका षटकात 43 धावा दिल्या. क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने एका षटकात घेतलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लुईस किम्बरने शानदार फलंदाजी करताना या षटकात सहा चौकार आणि दोन षटकारांसह 37 धावा केल्या, तर एक धाव घेतली. या षटकात रॉबिन्सनने तीन नो बॉल टाकले, ज्याची पेनल्टी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये 2 धावा आहे. (हेही वाचा: David Warner Retirement: डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जेक-फ्रेझर मॅकगर्कला उत्तराधिकारी केले नियुक्त, इंस्टाग्रामवर शेअर केली स्टोरी)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now