WI vs SA, 2nd T20I Live Score Update: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे दुसरा टी-20 सामना, एका क्लिकवर येथे पाहा थेट स्कोअर
WI vs SA: वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.
West Indies Cricket Team vs South Africa National Cricket Team: तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (West Indies Cricket Team) आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यात त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलकडे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम करत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचा थेट स्कोअर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सामन्याचा थेट स्कोअर पाहण्यासाठी यावर क्लिक करा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)