IND vs SA 1st ODI: पावसामुळे आज पहिला एकदिवसीय सामना उशिरा सुरू होणार; बीसीसीआयने दिली अपडेट, घ्या जाणून

पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता निश्चित केला जाणार होता, मात्र आता बीसीसीआयने त्यात बदल केला आहे.

लखनौमध्ये पाऊस सुरू असून त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे उशिरा सुरू होईल. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता निश्चित केला जाणार होता, मात्र आता बीसीसीआयने त्यात बदल केला आहे. प्राथमिक तपासणीनंतर असे आढळून आले आहे की नाणेफेक आता 1 वाजता नाही तर 1:30 वाजता होणार आहे आणि पहिला चेंडू 2 वाजेपर्यंत टाकला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)