Simran Shaikh On Virat Kohli: 'विराट कोहलीला भेटने माझे स्वप्न'.... डब्ल्यूपीएल लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू सिमरन शेखने सांगितली मनातील गोष्ट (Watch Video)
गुजरात टायटन्सने या लिलावात सर्वाधिक बोली लावून मुंबईची अष्टपैलू सिमरन शेखला 1.9 कोटी रुपये खर्च करुन आपल्या संघात समाविष्ट केले. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथील 22 वर्षीय सिमरनने सांगितले की तिला तिचा आदर्श विराट कोहलीलाही भेटायचे आहे.
WPL Auction 2025: महिला प्रीमियर लीग 2025 चा मिनी लिलाव रविवारी बंगळुरू येथे पार पडला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) या लिलावात सर्वाधिक बोली लावून मुंबईची अष्टपैलू सिमरन शेखला (Simran Shaikh) 1.9 कोटी रुपये खर्च करुन आपल्या संघात समाविष्ट केले. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथील 22 वर्षीय सिमरनने सांगितले की तिला तिचा आदर्श विराट कोहलीलाही (Virat Kohli) भेटायचे आहे. मुलींना खेळ खेळण्यापासून परावृत्त करणाऱ्या आर्थिक अडचणी आणि सामाजिक नियमांचा सामना करूनही सिमरनचे कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तिने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "माझा प्रवास आता सुरू झाला आहे. मला माझे सर्वोत्तम द्यायचे आहे, कठोर परिश्रम करायचे आहेत. मला दुसरी जर्सी हवी आहे, जी भारताची जर्सी असावी. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन." "मला विराट कोहली खूप आवडतो. त्याला भेटण्याचे माझे स्वप्न आहे," असे तिने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)