CWG 2022: बीडच्या अविनाश साबळेने भारतासाठी जिंकून दिले रौप्य पदक, कुस्तीपटू पूजा सिहाग उपांत्य फेरीत

कुस्तीपटू पूजा सिहागने 76 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या मिशेल मॉन्टेगचा 5-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Avinash Sable (Photo Credit - Twitter)

बीडच्या अविनाश साबळेने याने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे. साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. कुस्तीपटू पूजा सिहागने 76 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या मिशेल मॉन्टेगचा 5-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना अगदी जवळचा होता, पण शेवटी पूजाने बाजी मारली.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)