Asia Cup 2023, IND vs NEP Live Score Updates: पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात, भारतासमोर आता 23 षटकांत 145 धावांचे आव्हान
भारताला जिंकण्यासाठी अजून 114 धावांची गरज आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला. तब्बल दिड ते दोन तास पावसाचा खेळ सुरु राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आता डिएलएसच्या नियमानुसार 23 षटकांत 145 धावांचे आव्हान हे ठेवण्यात आले आहे. सध्या भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळपट्टीवर खेळत असून 5 षटकांत भारताने बिनबाद 31 धावा केल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी अजून 114 धावांची गरज आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)