Paris Olympic 2024: नेमबाजीत चौथ्या पदकाच्या आशा उंचावल्या; अनंतजीत सिंग आणि महेश्वरी चौहान ब्राँझसाठी खेळणार

नेमबाजीतील स्किट प्रकारात मिश्र गटात भारताच्या महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग या जोडीने कांस्य पदकाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली आहे.

Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी शानदार कामगिरी केली आहे. आता सोमवारी नेमबाजीतील स्किट प्रकारात मिश्र गटात भारताच्या महेश्वरी चौहान (Maheshwari Chauhan)आणि अनंतजीत सिंग(Anantjeet Singh) या जोडीने कांस्य पदकाच्या ( Bronze Medal)लढतीसाठी पात्रता मिळवली आहे. सोमवारी दुपारी स्किट प्रकारातील मिश्र गटाची क्वालिफायर स्पर्धा झाली. यामध्ये भारताची जोडी संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे त्यांना आता चीनविरुद्ध कांस्य पदकासाठी खेळावे लागेल. कांस्य पदकाचा सामना आज सोमवारीच संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. (हेही वाचा:Paris Olympics 2024: भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा रोमानियावर विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; मनिका बत्राचीही चमकदार कामगिरी)

पोस्ट पहा