Zomato Delivery Boy Steal Customer's Package: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला चोर, ग्राहकाचे घराबाहेरील खाद्यपदार्थाचे दुसरे पार्सल केले लंपास; सीसीटीव्ही समोर येताच कंपनीने मागितली माफी (Watch Video)

X वापरकर्त्याने सांगितले की, झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने त्यांची ऑर्डर वितरीत केली. मात्र, दरवाजाबाहेर ठेवलेले दुसरे खाद्यपदार्थाचे पार्सल उचलून नेले. व्हिडिओ पुढे सरकत असताना, घटनेतील सर्व घडामोडी घडताना दिसत आहेत.

Zomato Delivery Boy Steal Customer's Package: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह बेंगळुरूमधील एका ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर त्याचे दुसरे फूड पॅकेज चोरताना दिसत आहे. त्याबाबतची तक्रार ग्राहकाने X वर मांडली. ग्राहक पत्रकार आदित्य कालरा या X वापरकर्त्याने सांगितले की, झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने त्यांची ऑर्डर दिली आणि दरवाजाबाहेर ठेवलेले दुसरे खाद्यपदार्थ दिसल्यानंतर तो ते  उचलून घेऊन गेला. व्हिडिओ व्हायरल होताच झोमॅटो केअरने माफी मागितली आणि घटनेत जबाबदार असलेल्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

पोस्ट पहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now