Zomat Push Swiggy: झोमॅटोच्या पाठिंब्यावर स्वीगी धावते पुढे (Watch)
हातमध्ये स्मार्टफोन आल्यापासून जवळपास प्रत्येकजणच काहीसा स्मार्ट झाला आहे. हातातील मोबाईलच्या कॅमेऱ्याचा वापर करुन प्रत्येक नागरिक काही ना काही हटके फोटो, व्हिडिओ कैद करत असतो. पुण्यातही असेच काहीसे घडले. ज्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हातमध्ये स्मार्टफोन आल्यापासून जवळपास प्रत्येकजणच काहीसा स्मार्ट झाला आहे. हातातील मोबाईलच्या कॅमेऱ्याचा वापर करुन प्रत्येक नागरिक काही ना काही हटके फोटो, व्हिडिओ कैद करत असतो. पुण्यातही असेच काहीसे घडले. @punekarnews नावाच्या एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, स्वीगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला झोमॅटो कंपनीचा डिलीव्हरी बॉय धक्का देतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
खरे पाहता झोमॅटो आणि स्वीगी हे परस्परांचे स्पर्धक. पण व्यवसायात स्पर्धा असली तरी डिलीव्हरी बॉय हे परस्परांचे मित्रच असतात. त्यामुळे अडचणींच्या वेळी हे डिलिव्हरी बॉय परस्परांचे कॉम्रेड बनतात आणि मग मदतीला कोणतीही कसूर ठेवत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बहुदा असेच काहीसे सूचवत असावा. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. (हेही वाचा, Zomato Delivery Boy Steal Customer's Package: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला चोर, ग्राहकाचे घराबाहेरील खाद्यपदार्थाचे दुसरे पार्सल केले लंपास; सीसीटीव्ही समोर येताच कंपनीने मागितली माफी (Watch Video))
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)