Youths Splash Water on Passing Train: टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांनी बाईकच्या साहाय्याने शिंपडले चालू -ट्रेनवर पाणी; संतप्त प्रवाशांनी धु..धु..धुतलं ! (Watch Video)
टिकटॉक व्हिडिओ बनवताना हे तरुण हे कृत्य करत होते. त्यांच्या ट्रेन थांबणार नाही, असं वाटलं. परंतु, त्यांच्या अपेक्षेविरुद्ध ट्रेन थांबवली आणि संतप्त प्रवाशांनी तरुणांना बेदम मारहाण केली. गोंधळ सुरू होताच पोलीस अधिकाऱ्यांनी दुचाकी जप्त केली. तसेच तरुण घटनास्थळावरून पळून गेले.
Youths Splash Water on Passing Train: पाकिस्तानमध्ये टिकटॉक व्हिडिओ (Tiktok video) बनवणाऱ्या तरुणांना चालू रेल्वेवर पाणी उडवल्याचं चांगलचं महागात पडलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तरुण रेल्वे रुळांच्या खाली तलावात दुचाकी पार्क करून जाणाऱ्या ट्रेनवर पाणी शिंपडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. टिकटॉक व्हिडिओ बनवताना हे तरुण हे कृत्य करत होते. त्यांच्या ट्रेन थांबणार नाही, असं वाटलं. परंतु, त्यांच्या अपेक्षेविरुद्ध ट्रेन थांबवली आणि संतप्त प्रवाशांनी तरुणांना बेदम मारहाण केली. गोंधळ सुरू होताच पोलीस अधिकाऱ्यांनी दुचाकी जप्त केली. तसेच तरुण घटनास्थळावरून पळून गेले. प्रवाशांनी या तरुणांचा पाठलाग करून त्यांना चोप दिला. घटनेचे गांभीर्य असूनही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)