World's Most Expensive Dog 'WolfDog': बेंगळुरू येथील व्यक्तीने खरेदी केला लांडगा आणि कुत्र्याचे मिश्रण असलेला 'वुल्फडॉग' प्राणी; किंमत 50 कोटी
अमेरिकेत जन्मलेला कॅडाबॉम्स ओकामी वुल्फडॉग केवळ आठ महिन्यांचा असून, त्याचे वजन 75 किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. तो दररोज अंदाजे 3 किलो कच्चे मांस खातो. जंगली लांडग्यासारखे दिसणारे हे प्राणी, त्याच्या आकार आणि ताकदीमुळे, इतर पाळीव कुत्र्यांच्या जातींपेक्षा वेगळे आहेत.
बेंगळुरू येथील एका श्वानपालकाने लांडगा आणि कुत्र्यामधील क्रॉस ब्रीड खरेदी केला आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी त्याने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. अहवालानुसार, एस सतीशने अत्यंत दुर्मिळ अशा ‘लांडगा कुत्रा’ खरेदी करण्यासाठी तब्बल 4.4 दशलक्ष पौंड (अंदाजे 50 कोटी) रक्कम दिली आहे. द सनने याबाबत वृत्त दिले आहे. वुल्फडॉग हा अशा प्रकारचा पहिलाच प्राणी मानला जातो. हा प्रत्यक्ष लांडगा आणि कॉकेशियन शेफर्ड यांच्यातील क्रॉस आहे. कॅडाबोम्स ओकामी नावाचा हा कुत्रा फेब्रुवारीमध्ये सतीशला विकण्यात आला. लांडगा आणि कुत्रा यांच्यातील संकरीकरणामुळे वुल्फडॉग्स तयार होतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की लांडग्यांपेक्षा हा प्राणी जास्त धोकादायक असू शकतो.
अमेरिकेत जन्मलेला कॅडाबॉम्स ओकामी वुल्फडॉग केवळ आठ महिन्यांचा असून, त्याचे वजन 75 किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. तो दररोज अंदाजे 3 किलो कच्चे मांस खातो. जंगली लांडग्यासारखे दिसणारे हे प्राणी, त्याच्या आकार आणि ताकदीमुळे, इतर पाळीव कुत्र्यांच्या जातींपेक्षा वेगळे आहेत. काकेशस पर्वतांमध्ये पारंपारिकपणे भक्षकांपासून पशुधनाचे रक्षण करण्यासाठी अशा प्राण्यांची पैदास केली जाते. लांडगा आणि कुत्रा या दोन शक्तिशाली प्रजातींच्या संयोजनामुळे एक अद्वितीय प्राणी तयार होतो, जो लांडग्याच्या जंगली स्वभावाचे आणि रक्षक कुत्र्याच्या निष्ठेचे प्रतीक आहे. कॅडाबॉम्स ओकामी अल्पावधीतच कर्नाटकात एक सेलिब्रिटी बनला आहे, तो सतीशसोबत हाय-प्रोफाइल कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतो. (हेही वाचा: Viral Video: समुद्राच्या खोलीतील एलियन्स सारख्या दिसणाऱ्या आणखी एका विचित्र जीवाचा व्हिडीओ व्हायरल)
World's Most Expensive Dog 'WolfDog':
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)