Rajasthan Horror: जैसलमेरमध्ये महिलेचे फिल्मी स्टाईलमध्ये अपहरण करून केलं जबरदस्तीने लग्न; DCW चीफ स्वाती मालीवाल यांनी CM अशोक गेहलोत यांना केली हस्तक्षेपाची मागणी, Watch Video

मालीवाल यांनी राजस्थान सरकारला या प्रकरणी लक्ष घालून त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Kidnapping and forced marriage of a woman (PC - Twitter)

Rajasthan Horror: राजस्थानचे वाळवंट म्हटला जाणारा जैसलमेर जिल्हा सध्या सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चांगलाचं चर्चेत आला आहे. 1 जून रोजी शहरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चित्रपटातील एखाद्या सीनपेक्षा कमी नाही. एक तरुण एका मुलीला उचलून घेऊन जळत्या गवताभोवती फिरत आहे. एक महिला त्याला असे करण्यापासून थांबवताना दिसते, परंतु मुलगा सर्व फेऱ्या मारून मुलीला सोडून जातो. या घडामोडीनंतर पोलिसांनी कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली, तर उर्वरित आरोपी फरार आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका भयानक व्हिडिओमध्ये एक पुरुष एका तरुण मुलीशी जबरदस्तीने लग्न करताना दिसत आहे. मालीवाल यांनी राजस्थान सरकारला या प्रकरणी लक्ष घालून त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - UP Shocker: छेडछाडीला विरोध केल्याने पीडितेच्या घरावर गोळीबार; घटना CCTV मध्ये कैद, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)