Viral Video: माझी बायको वारंवार पळून जाते म्हणुन मी मुलांना घेवून भीक मागतो, माझ्यावर मुलांसह आत्महत्या करण्याची वेळ; ऐका बापमाणसाची व्यथा Watch Video
एवढचं नाही तर आतापर्यत त्याची बायको ३० ते ३५ वेळा पळून गेल्याचा दावा देखील केला आहे तरी सोशल मिडीयावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
बिहारमधील वेगवेगळ्या शहरांच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरुन फिरणाऱ्या एका बापमाणसाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात एक माणुस आपल्या दोन चिमुकल्यांसह भर थंडीत रस्त्यारस्त्यावर भिक मागताना दिसत आहे. त्यात त्याचं बोट धरुन असलेला छोटा मुलगा ५ वर्षांचा तर खांद्यावर बसलेली चिमुकली केवळ काही महिन्यांची आहे. या व्यक्तीला आई-वडिल बहिण भाऊस असं कुटुंब नाही तर त्याची बायको म्हणजेच या दोन चिमुल्यांची आई पळून गेल्यामुळे त्याच्यावर अशी भिक मागायची वेळ आल्याचं या व्यक्तीने सांगितल आहे. एवढचं नाही तर आतापर्यत त्याची बायको ३० ते ३५ वेळा पळून गेल्याचा दावा देखील केला आहे तरी सोशल मिडीयावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)