IPL Auction 2025 Live

Water Flows Out of 150-Year-Old Mulberry Tree: मॉन्टेनेग्रोमधील डिनोसा येथील 150 वर्ष जुन्या तुतीच्या झाडातून वाहते पाणी, काय आहे कारण? जाणून घ्या

तथापि, हे कसे घडते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यामागील कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mulberry Tree Viral Video (PC - Twitter/@gunsnrosesgirl3)

Water Flows Out of 150-Year-Old Mulberry Tree: सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाला नसलेल्या तुतीच्या झाडातून पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. मॉन्टेनेग्रोचे डायनोसा हे तुतीचे झाड त्याच्या खोडात नळ बसवल्याप्रमाणे पाणी बाहेर काढताना दिसत आहे. झाडाच्या खोडातून पाणी वाहत असल्याचं पाहून नेटिझन्स अवाक झाले. तथापि, हे कसे घडते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यामागील कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुसळधार पावसात तुतीच्या झाडांमधून पाणी गळते. कारण, भूगर्भातील झऱ्यामुळे एक मजबूत दाब निर्माण होतो. ज्यामुळे तुतीच्या झाडाच्या खोडांमधून पाणी बाहेर पडते. (हेही वाचा -Just Looking Like a Wow: शिक्षिकेची इंग्रजी व्याकरण शिकवण्याची हटले स्टाईल 'जस्ट लूकिंग लाईक अ वाव')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)