Viral Video: मच्छीमाऱ्याच्या जाळ्यात सापडला अत्यंत दुर्मिळ Blue Lobster; 20 लाखांमध्ये एखाद्याचाच रंग असा (Watch)

या मच्छिमाराच्या जाळ्यात एक दुर्मिळ ब्लू लॉबस्टर अडकला आहे. हा अत्यंत दुर्मिळ मासा आहे.

Extremely Rare Blue Lobster

मच्छीमारांचे आयुष्य हे माशांच्या मदतीनेच चालते. म्हणूनच दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी मच्छीमार मासेमारीसाठी दररोज समुद्राकडे वळतो. मासेमारी हे त्यांचे रोजचे काम असले तरी, काही वेळा काही मच्छीमारांचे नशीब असे बदलते की ते क्षणात कोट्याधीश होतात. कधी कधी त्यांच्या जाळ्यात असे मासे अडकतात जे एकतर खूप महाग असतात किंवा अत्यंत दुर्मिळ असतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकन मच्छिमारासोबत घडला आहे. या मच्छिमाराच्या जाळ्यात एक दुर्मिळ ब्लू लॉबस्टर अडकला आहे. हा अत्यंत दुर्मिळ मासा आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की दोन दशलक्ष लॉबस्टरपैकी एका लॉबस्टरचा रंग निळा असतो. या लॉबस्टरची किंमत USD 500 असल्याचा अंदाज आहे. सध्या या लॉबस्टरचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement