Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये तब्बल 15 किमी खिडकीला लटकून राहिला चोर; मोबाईल चोरणे आले अंगाशी (Watch)

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Viral Video

बिहारच्या बेगुसरायमध्ये चालत्या ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करताना एक चोर अगदी मरता मरता वाचला आहे. स्थानकातून रेल्वे बाहेर पडतानाच या चोराने खिडकीत हात घालून प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी प्रवाशाने त्याचा हात पकडला. ताबडतोब दुसऱ्या एका प्रवाशाने चोराचा दुसरा हात पकडला व चोर खिडकीला तसेच लटकून राहिला. या दरम्यान रेल्वे स्थानकातून बाहेर पडली. सुमारे 15 किमीपर्यंत चोर असाच खिडकीला लटकून राहिला होता. रेल्वेतील प्रवाशांनी या चोरट्याला बेगुसरायच्या साहेबपूर कमल स्थानकावरून खगरियाला नेले.

नंतर त्याला खगरिया स्थानकावर जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले. त्याचे नाव पंकज कुमार आहे. तो बेगुसरायच्या साहेबपूर कमल पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now