Viral Video: भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल
एका मुलाने अश्लील कमेंट करून तिची छेड काढल्याचा आरोप मुलीने केला आहे. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. गोंधळ घातल्याप्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थिनीसोबत छोडछाड केल्याच्या आरोपावरुन भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचे दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलाने अश्लील कमेंट करून तिची छेड काढल्याचा आरोप मुलीने केला आहे. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. गोंधळ घातल्याप्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी नसलेल्या काही बाहेरील व्यक्तींचाही या लढाईत सहभाग असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. कॅम्पसमध्ये झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटांना शांत केले. चार विद्यार्थ्यांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)