Stunt With Firecracker In Wedding Procession: लग्नाच्या वरातीत फटाक्यांसोबत धोकादायक स्टंट (Watch Video)

ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फटाके कसे फोडून नये याचे उत्तम उदाहरण म्हणज हा व्हिडिओ ठरावा. सोशल मीडिया मंच X वर केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ एका लग्नातील वरातीचा आहे.

Firecracker | (Photo Credit - X)

फटाके आणि आपले सण, उत्सव हे समिकरणच आहे. सण असो की उत्सव अथवा एखादा घरगुती समारंभ फटाक्यांशिवाय पूर्ण होणे तसे विरळच. त्यामुळे वाढदिवस, लग्नसमारंभ, मूंज अशा सर्वच बाबतीच फटाके फोडणे हा एक कार्यक्रमातील कार्यक्रम असतो. सोशल मीडियावर फटाके फोडतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फटाके कसे फोडून नये याचे उत्तम उदाहरण म्हणज हा व्हिडिओ ठरावा. सोशल मीडिया मंच X वर केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ एका लग्नातील वरातीचा आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती फटाके अत्यंत चुकीच्या पद्धतीने फोडत आहे. फटाक्यांची माळ असलेले खोके त्याने चक्क आपल्या हातात घेतले आहे. या खोक्यातील फटाके पेटवून ते फुटत असताना तो गर्दीमध्ये नाचतही आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)