Viral Video: गणपती मंडळात वृद्ध मुस्लीम व्यक्तीने केले दान; गणेशोत्सवात दिसून आले हिंदू-मुस्लीम ऐक्य (Watch)

भलेही गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असो, मात्र बाप्पावर इतर धर्मीयांचीही श्रद्धा असल्याची अनेक उदाहरणे दिसून आली आहेत

गणपती मंडळात वृद्ध मुस्लीम व्यक्तीने केले दान (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकताच देशभरात दहा दिवशीय गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी मंडळेही उभारण्यात आली होती. भलेही गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असो, मात्र बाप्पावर इतर धर्मीयांचीही श्रद्धा असल्याची अनेक उदाहरणे दिसून आली आहेत. आता या गणेशोत्सवादरम्यान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक उत्तर उदाहरण समोर आले आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध मुस्लीम व्यक्ती गणपतीच्या पेटीत दान टाकताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी मन भरून आल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement