Viral Video: चीनची मुलगी झाली संगमनेरची सून; राहुल हांडेने थाटामाटात बांधली 'शान यान छांग'ची लग्नगाठ (Watch)

पुढे उत्तम प्रशिक्षक झाल्यानंतर योगशिक्षक म्हणून तो चीनमध्ये काम करू लागला होता.

चीनची मुलगी झाली संगमनेरची सून

महाराष्ट्रातील तरुण आणि चीनची मुलगी यांचे प्रेमप्रकरण व लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. संगमनेरच्या राहुल हांडे या तरुणाने चीनच्या ‘शान’ नावाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली आहे. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. योगाच्या माध्यमातून 29 वर्षीय राहुल व 31 वर्षीय शान यांची ओळख झाली व लवकरच या ओळखीचे रुपांतर प्रेम आणि नंतर लग्नात झाले. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील राहुल हा चीनमध्ये योगाचे धडे देण्यासाठी गेला होता, तिथे त्याची भेट शानशी झाली. आता तालुक्यातल्या घारगाव गावातील एका मंगल कार्यालयात या दाम्पत्याचा विवाह सोहळा थाटात पार पडला. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राहुल हांडे या तरुणाने संगमनेर महाविद्यालयात योगाचे शिक्षण घेतले. पुढे उत्तम प्रशिक्षक झाल्यानंतर योगशिक्षक म्हणून तो चीनमध्ये काम करू लागला होता. राहुल हांडे आणि शान यान छांग यांनी प्रथम चिनी पद्धतीने कोर्ट मॅरेज केले व भारतात आल्यानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचा विवाह झाला. (हेही वाचा: Foreign Tourist Molested in Jaipur Video: जयपूर मध्ये परदेशी महिलेच्या छेडछाड प्रकरणी ऑटो रिक्षा चालक ताब्यात; व्हिडिओ वायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)