Viral Video: रेल्वे क्रॉसिंगवर बाईकला धडकली भरधाव वेगाने धावणारी ट्रेन, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch)

रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकलेल्या दुचाकीचे तुकडे काढून ट्रेन तत्काळ पुढे रवाना केली.

Viral Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

इटावा शहरातील रामनगर रेल्वे फाटकावर एक बाईक ट्रेनसमोर आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. अपघातामध्ये दुचाकी स्वाराने कसाबसा आपला जीव वाचवला मात्र आपली गाडी त्याला रेल्वे रुळावर तशीच सोडून द्यावी लागली. त्याचवेळी हातियाहून आनंद बिहारकडे जाणाऱ्या झारखंड स्वर्ण जयंती एक्सप्रेसने दुचाकीला धडक दिली. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वेखाली दुचाकी अडकल्यानंतर ती जवळजवळ अर्धा किलोमीटर रुळावर ओढली गेली. त्यानंतर ट्रेन चालकाने ट्रेनला ब्रेक लावून अपघात झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यावर आरपीएफ आणि तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकलेल्या दुचाकीचे तुकडे काढून ट्रेन तत्काळ पुढे रवाना केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)