Viral Video: बिबट्याने केला सायकलस्वारावर जीवघेणा हल्ला, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिबट्या रस्त्यावरून जात असलेल्या सायकलस्वारावर अचानक हल्ला करतो. हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Viral Video: सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे भयंकर वन्य प्राणी क्षणार्धात शिकार करतात, यामुळे जंगलातील इतर प्राणी या प्राण्यांना घाबरतात आणि मानवानेही त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले मानले आहे. मात्र, काहीवेळा प्राणी जंगलातून बाहेर पडतात आणि निवासी भागात घुसतात आणि लोकांवर हल्लाही करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिबट्या रस्त्यावरून जात असलेल्या सायकलस्वारावर अचानक हल्ला करतो. हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडिओ @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून याला 8.8 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला सायकल चालवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अचानक झुडपातून बिबट्या आला त्या व्यक्तीवर हल्ला केला.
मात्र, बिबट्याच्या हल्ल्यामुळेतो व्यक्ती सायकलवरून पडल्याने तो सुखरूप बचावला ही दिलासादायक बाब आहे. व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर बिबट्या पुन्हा जंगलात पळून जातो.