Video: क्रिप्टोकरन्सी Shiba Inu चा डेव्हलपर Shytoshi Kusama आपल्या पार्टनरसह भारतामध्ये आला? मुंबई विमानतळावर दिसले मास्क घातलेले दोन तरुण (Watch Video)
सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये कुसामा पांढऱ्या पोशाखात दिसत आहे. त्याच्या साथीदारानेही काळा हुड आणि काळा मुखवटा घातलेला आहे. त्यांच्या भेटीच्या उद्देशाबाबतचा तपशील अद्याप उघड झालेला नाही.
Shytoshi Kusama Arrived in India: शिबा इनू (Shiba Inu) डेव्हलपर श्योतोशी कुसामा (Shytoshi Kusama) आपल्या मिस्ट्री पार्टनरसह भारतात आल्याची माहिती आहे. सध्या सोशल मिडियावर मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुखवटा घातलेले पुरुष दिसून येत आहेत. यातील एक श्योतोशी, तर दुसरा त्याचा अज्ञात सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे क्रिप्टोकरन्सी समुदायामध्ये कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये कुसामा पांढऱ्या पोशाखात दिसत आहे. त्याच्या साथीदारानेही काळा हुड आणि काळा मुखवटा घातलेला आहे. त्यांच्या भेटीच्या उद्देशाबाबतचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. श्यतोशीने 06 जुलै रोजी तो भारतात येणार असल्याची घोषणा केली होती. काही रिपोर्ट्समध्ये अन्नात अंबानीच्या लग्नात सामील होण्यासाठी श्योतोशी भारतामध्ये आल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: X Banned Over 1.9 lakh Accounts in India: एक्सची भारतात मोठी कारवाई; एकट्या जून महिन्यात 1.9 लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदी)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)