Vanshika’s Viral Break-Up Video: वंशिकाची ब्रेकअप स्टोरी व्हायरल; मैत्रिणीने कॉल रेकॉर्ड करून सोशल मिडियावर केला शेअर, बनत आहेत मीम्स (Watch)
वंशिकाचे रिलेशनशिपनंतर अवघ्या दोन महिन्यात ब्रेकअप झाले आहे. आकाश नावाच्या तरुणाने दोन महिन्यातच तिच्याशी ब्रेकअप केले आहे.
सध्या सोशल मिडियावर वंशिका आणि तिची ब्रेकअप स्टोरी व्हायरल होत आहे. वंशिका ट्रेंडमध्येही आहे. पण ही वंशिका नक्की कोण आहे? खरे सांगायचे तर आम्हालाही माहित नाही. परंतु आम्हांला हे माहीत आहे की, वंशिकाला तिचे मित्र बदलण्याची गरज आहे. कारण वंशिकाच्या ब्रेकनंतर तिच्या मैत्रिणीने तिची ब्रेकअप स्टोरी ऑनलाइन शेअर केली आहे. वंशिकाचे रिलेशनशिपनंतर अवघ्या दोन महिन्यात ब्रेकअप झाले आहे. आकाश नावाच्या तरुणाने दोन महिन्यातच तिच्याशी ब्रेकअप केले आहे. परंतु आता तिच्या ब्रेकअप स्टोरीवर मीम्स बनत आहेत, कारण ही स्टोरी व्हायरल झाली आहे.
जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे. तर एका अकाऊंटने @hajarkagalwa या हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक फोन कॉल ऐकू येत आहे. या फोन कॉलवर वंशिका तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीशी तिच्या ब्रेकअपबद्दल बोलत आहे. वंशिका रडत रडत आपल्या भावना व्यक्त करत आहे. परंतु या मैत्रिणीने वंशिकाचा फोन स्पीकरवर ठेऊन हा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला व आता आता तो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोन कॉलवर वंशिका ज्या पद्धतीने तिची ब्रेकअप स्टोरी कथन करत आहे ती आता चर्चेही बाब बनली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)