United Airlines Boeing Plane Loses Wheel: लॉस एंजेलिस विमानतळावरून उड्डाण घेताच युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाचे चाक निघाले (Watch Video)

घटनेवेळी विमानात 179 प्रवासी होते. ते सर्व सुरक्षितपणे नंतर विमानातून उतरले.

United Airlines Boeing Plane Loses Wheel: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लॉस एंजेलिस विमानतळावरून उड्डाण करताच युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग फ्लाइटचे चाक निघाले. अहवालानुसार, लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ (LAX) च्या रनवे 25R वरून उड्डाण करताना युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग विमानाचे एक चाक निघाले. सोमवारी, 8 जुलै रोजी युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट डेन्व्हर, कोलोरॅडो येथे जात असताना ही घटना घडली. घटनेवेळी विमानात 179 प्रवासी होते. ते सर्व सुरक्षितपणे नंतर विमानातून उतरले. विमान कंपनीने या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की नंतर चाक परत बसवण्यात आले. सध्या विमानाचे चाक कसे निघाले या घटनेची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा:Bull Fight On Railway Track: खतरनाक! थेट रेल्वे रुळाजवळ बैलांची झुंज, लोको पायलटने थांबवली ट्रेन )

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)