Womens Partially Buried In Murrum: खासगी जमिनीवर रस्ता बांधण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलांना गुंडांनी जिवंत गाडले; पहा व्हिडिओ
अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) विवेक लाल यांनी सांगितले की, ममता पांडे आणि आशा पांडे या महिला रस्त्याच्या बांधकामाला विरोध करत होत्या. त्या मुरूमखाली अर्धवट गाडल्या गेल्या. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल.
Womens Partially Buried In Murrum: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात रस्ता बांधकामाला विरोध करणाऱ्या दोन महिलांवर ट्रकमधून मुरूम टाकण्यात आला. या घटनेत महिला मुरूमामध्ये अर्धवट गाडल्या गेल्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी मंगवा पोलिस स्टेशन अंतर्गत हिनोटा जोरोत गावात घडलेल्या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये दोन महिला मुरुमने अर्धवट गाडल्या गेल्याचे दिसत आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) विवेक लाल यांनी सांगितले की, ममता पांडे आणि आशा पांडे या महिला रस्त्याच्या बांधकामाला विरोध करत होत्या. त्या मुरूमखाली अर्धवट गाडल्या गेल्या. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)