Tirupati: तिरुमला घाट रोडवर धावत्या कारचे दरवाजे उघडून सेल्फी घेणाऱ्या 5 जणांसह चालकाला अटक (Video)

1 डिसेंबर रोजी सेल्फी घेताना तिरुमला घाट रोडवर धावत्या कारचे दरवाजे उघडून तेथे उभे राहून सेल्फी घेणाऱ्या 5 जणांसह चालकाला पोलिसांनी अटक केली.

Photo Credit- X

Tirupati: कारचे दारवाजे आणि सनरूफ उघडून सेल्फी घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 1 डिसेंबर रोजी तिरुमला घाट रोडवर ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन पुरुष लटकलेले दिसत आहेत. कारच्या खिडक्यांमधून आणि उघड्या सनरूफवर उभे असलेले दोघे दिसत आहेत. ते सर्व रिमझिम पावसाचा आनंद घेत होते. या स्ंटटबाजीमुळे काही काळ तेथील रस्त्यांवर गोंधळ उडाला आणि इतर वाहनधारकांना धोका निर्माण झाला. तिरुपती पोलिसांनी वेगवान कारवाई करत चालकासह सहाही जणांना अटक केली आणि वाहन जप्त केले. बेपर्वाईने वाहन चालवणे आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Anand Mahindra Response to Criticism: महिंद्रा कार्सवर तिखट टीका, आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर; सोशल मीडियात चर्चा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)