'Threesome' Goes Horribly Wrong: हॉटेलमध्ये पत्नी दोन प्रियकरांसह आक्षेपार्ह स्थितीत आढळली; संतापलेल्या पतीने केली मारहाण, Viral Video

पतीला याचा सुगावा लागल्यानंतर तो संपूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने जबरदस्तीने रूमचा दरवाजा उघडायला लावला आणि आतमध्ये तिघांनाही पकडले.

'Threesome' Goes Horribly Wrong

'Threesome' Goes Horribly Wrong: उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला डॉक्टर हॉटेलच्या खोलीत इतर दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेमध्ये आढळली आहे. ही महिला सरकारी डॉक्टर असून, ती गेल्या एक वर्षापासून पतीपासून वेगळी राहत होती. गेले अनेक दिवस पतीला आपल्या पत्नीवर संशय होता व तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. एके दिवशी ही महिला डॉक्टर दोन पुरुषांसह हॉटेलच्या खोलीत पोहोचली. पतीला याचा सुगावा लागल्यानंतर तो संपूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने जबरदस्तीने रूमचा दरवाजा उघडायला लावला आणि आतमध्ये तिघांनाही पकडले. यानंतर त्याने पत्नीसह दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली. महिलेसोबत असलेला एक तरुण गाझियाबादचा तर दुसरा बुलंदशहरचा रहिवासी आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही पकडून पोलीस ठाण्यात नेले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पती आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरांना मारहाण करताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराला गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिस फार काही करू शकत नाहीत. (हेही वाचा: Viral Video: शाळेत गोंधळ! आग्रामध्ये प्राचार्य आणि महिला शिक्षकांमध्ये जोरदार भांडण, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif