Viral Video: हेल्मेटशिवाय ट्रिपल सीट घेऊन जात होता तरुण; पोलिसांनी फाडली पावती; संतापलेल्या चालकाने पेटवली बाईक, पहा व्हिडिओ
त्यानंतर वैतागलेल्या दुचाकीस्वाराने राजापूरच्या मधल्या चौकात आपल्या हिरो होंडा दुचाकीला आग लावली.
Viral Video: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात ट्रॅफिक पोलिसांच्या चालानमुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने आपली दुचाकी पेटवून दिली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, सदर कोतवाली परिसरातील राजापूर पोलीस चौकीजवळ तैनात असलेल्या वाहतूक पोलीसांना हिरो होंडा दुचाकीवरील तीन तरुण घटनास्थळावरून येताना दिसले.
यावर वाहतूक पोलिसांनी दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला आणि ट्रीपल सीट जाणाऱ्यांना दंड ठोठावला. त्यानंतर वैतागलेल्या दुचाकीस्वाराने राजापूरच्या मधल्या चौकात आपल्या हिरो होंडा दुचाकीला आग लावली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)