Madhya Pradesh: तरुणाने बेशुद्ध आजोबांना दुचाकीवर घेऊन फिल्मी स्टाईलमध्ये केलं इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल, नेटीझन्सना आठवला ‘3 इडियट्स’मधील सीन, Watch Video

या तरुणाने आपल्या पेशंटला दुचाकीवरून थेट आपत्कालीन वॉर्डच्या बेडवर सोडले. यानंतर त्याने दुचाकी पार्किंगमध्ये लावली. हॉस्पिटलच्या गेटवर उभ्या असलेल्या गार्डने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण नीरज गुप्ता जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Man Enters Emergency Ward of Hospital (PC - X/@BSTVdigital)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सतना (Satna) येथील सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा रुग्णालय सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. सतना रोजच चर्चेचा विषय बनत असते, कारण इथे रोज काही ना काही प्रकरणे घडतच असतात. रूग्णालयात काही दिवसांपूर्वी बैल घुसल्याचा प्रकार समोर आला होता. ही या रूग्णालयात नित्याची बाब झाली आहे. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे हॉस्पिटलच्या आत बाईक फिरताना पाहून उपस्थित लोक थक्क झाले. या तरुणाने आपल्या पेशंटला दुचाकीवरून थेट आपत्कालीन वॉर्डच्या बेडवर सोडले. यानंतर त्याने दुचाकी पार्किंगमध्ये लावली. हॉस्पिटलच्या गेटवर उभ्या असलेल्या गार्डने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण नीरज गुप्ता जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे केल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तरुणाला खडसावले. (Woman Vulgar Dance Moves With PM Modi's Cutout: इंस्टाग्राम रीलसाठी सेल्फी पॉईंटवर महिलेने पंतप्रधान मोदींच्या कटआउटसमोर केला अश्लील डान्स, (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now