Fact Check: उन्हाळ्यात इंधन टाकी पूर्ण भरल्यास वाहनाचा स्फोट होण्याची शक्यता? Indian Oil ने सांगितले व्हायरल मेसेज मागील सत्य

टाकी अर्धी भरून त्यातील गॅस बाहेर पडू द्या, असंही या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे.

Fact Check (PC - Twitter)

सध्या सोशल मीडियावर इंडियन ऑइलच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की, उन्हाळ्यात वाहनात काठोकाठ इंधन भरल्याने वाहनांचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे टाकी पूर्ण भरू नये. या फोटोत इंडियन ऑइलचे ब्रँडिंग आणि हिंदीमध्ये मजकूर देण्यात आला आहे. या मजकूरात लोकांना उन्हाळ्यात जास्तीत जास्त संभाव्य मर्यादेपर्यंत इंधन टाक्या भरल्यास वाहनाच्या संभाव्य स्फोटाबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. टाकी अर्धी भरून त्यातील गॅस बाहेर पडू द्या, असंही या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे.

मात्र, हा मेसेज खोटा असल्याचं इंडियन ऑइलने सांगितलं आहे. या मसेजमध्ये करण्यात आलेले दावे निराधार आहेत. इंडियन ऑइलने 10 जून 2018 रोजी ट्विट करून स्पष्ट केले की कंपनीने असा कोणताही सल्ला दिला नाही.

Indian Oil Tweet -