Elephant Got Injured: वेगवान ट्रेनची हत्तीला जोरदार धडक; जखमी अवस्थेत रुळावरच सोडला प्राण (Watch Video)

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एका हायस्पीड ट्रेनची धडक लागून एक हत्ती जखमी होऊन रुळावर कोसळतो. यावेळी तो उठण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला यश येत नाही.

Photo Credit : X

Viral Video : सध्या इंटरनेटवर एका हत्तीचा एक अतिशय भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या मुक्या प्राण्याला ट्रेनने जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील जागीरोड रेल्वे स्थानकाजवळ या हत्तीला वेगवान ट्रेनने धडक दिली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एका हायस्पीड ट्रेनची धडक लागून एक हत्ती जखमी होऊन रुळावर कोसळतो. यावेळी तो उठण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला यश येत नाही. धडकेमुळे त्याला मागच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्याला चालताही येत नाही. अशा स्थितीत तो ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतो, मात्र पुन्हा खाली पडतो. अहवालानुसार, काही काळानंतर या हत्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हेही वाचा:  Elephant Viral Video: मुलांची कृती पाहून हत्तीला आला राग, पुढे चिडलेल्या गजराजने जे केले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

व्हिडिओ- 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now