Thane: एक्सप्रेस ट्रेन येण्याआधी तरुणाने मारली रुळावर उडी; पोलीस कर्मचाऱ्याने 'अशाप्रकारे' वाचवला जीव, CCTV मध्ये कैद झाली थरारक घटना

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पिवळा शर्ट घातलेला मुलगा ट्रेन येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवरून रुळावर उडी मारतो

पोलीस कर्मचाऱ्याने वाचवला जीव (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावरून एक्स्प्रेस ट्रेन जाण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी एका पोलीस कर्मचाऱ्याने एका मुलाला रेल्वे रुळावरून ढकलून त्याचा जीव वाचवला. ही घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पिवळा शर्ट घातलेला मुलगा ट्रेन येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवरून रुळावर उडी मारतो, मात्र त्यामुळे तो खाली पडतो. यानंतर तो शांतपणे ट्रॅकवरच उभा राहतो. तेवढ्यात एक पोलीस रुळावर उडी मारतो आणि या तरुणाला रुळावरून ढकलून देतो. पोलीस कर्मचाऱ्याने तरुणाला रुळावरून हटवल्यानंतर काही सेकंदांनी तिथून एक्स्प्रेस ट्रेन जाते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now