Thane: एक्सप्रेस ट्रेन येण्याआधी तरुणाने मारली रुळावर उडी; पोलीस कर्मचाऱ्याने 'अशाप्रकारे' वाचवला जीव, CCTV मध्ये कैद झाली थरारक घटना
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पिवळा शर्ट घातलेला मुलगा ट्रेन येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवरून रुळावर उडी मारतो
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावरून एक्स्प्रेस ट्रेन जाण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी एका पोलीस कर्मचाऱ्याने एका मुलाला रेल्वे रुळावरून ढकलून त्याचा जीव वाचवला. ही घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पिवळा शर्ट घातलेला मुलगा ट्रेन येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवरून रुळावर उडी मारतो, मात्र त्यामुळे तो खाली पडतो. यानंतर तो शांतपणे ट्रॅकवरच उभा राहतो. तेवढ्यात एक पोलीस रुळावर उडी मारतो आणि या तरुणाला रुळावरून ढकलून देतो. पोलीस कर्मचाऱ्याने तरुणाला रुळावरून हटवल्यानंतर काही सेकंदांनी तिथून एक्स्प्रेस ट्रेन जाते.
#WATCH | Maharashtra: A police personnel saved a teenage boy's life by pushing him away from the railway track just seconds before an express train crossed the spot at Vitthalwadi railway station in Thane district. (23.03)
Video Source: Western Railway pic.twitter.com/uVQmU798Zg
— ANI (@ANI) March 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2022 07:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

