Telangana: रोजगार हमीचे काम करताना तेलंगणामधील महिलेला चावला साप; मृत सापाला घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात, पहा व्हिडिओ

तेलंगणामधील मुलुगु जिल्ह्यातील मुकुनुरुपलेम गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेला रोजगार हमीचे काम करत असताना साप चावला. त्यानंतर या महिलेने त्या सापाला मारलं आणि ती हा साप घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली.

Telangana woman bitten by snake (PC - X/@TeluguScribe)

Telangana: तेलंगणामधील मुलुगु जिल्ह्यातील मुकुनुरुपलेम गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेला रोजगार हमीचे काम करत असताना साप चावला. त्यानंतर या महिलेने त्या सापाला मारलं आणि ती हा साप घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली. संथम्मा असं या महिलेचं नाव आहे. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. X वर वापरकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलुगु-वेंकटपुरम मंडलच्या मुकुनुरुपलेम गावातील रहिवासी असलेल्या संथम्माला रोजगार हमीचे काम करत असताना साप चावला. सापाविषयी खात्री नसल्याने संथम्माने तिने सापाला मारले आणि नंतर त्याला रुग्णालयात नेले. साप पाहून हैराण झालेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी हा साप विषारी असल्याचे सांगितले.

पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now